शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified शुक्रवार, 28 मे 2021 (11:03 IST)

इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहली अधिक धावा कसा बनवू शकतो हे कपिल देव यांनी सांगितले

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली तिसर्यांदा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू कपिल देवने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला विशेष सल्ला दिला आहे.
 
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव म्हणाले, "मी आशा करतो की तो सर्वोत्तम कामगिरी करेल. आपण खरोखर त्याला पकडू शकता का? सामंजस्याने खेळताना तो स्वाभाविक दिसतो. परंतु, मी त्याला हा सल्ला जरूर देईन की जास्त आक्रमक होऊ नको. त्याला सेशन टू सेशन खेळाचे सत्र समजावे लागेल. त्याने वर्चस्व ठेवण्याऐवजी आपल्या वेळेची प्रतीक्षा करावी लागेल, जर तो थोडासा संयम घेऊन खेळला तर तो धावा काढू शकतो. इंग्लंडमध्ये खूप लवकर आक्रमक होणे चालणार नाही, जेथे आपल्याला बॉल पाहायची गरज असते.  
 
कपिल देव पुढे म्हणाले की, जर तुम्ही सीमचा सामना केला आणि चेंडू चांगलाच स्विंग करत असेल तर संयम दाखवा. असे करून तुम्ही इंग्लंडमध्ये यशस्वी व्हाल. इंग्लंडच्या अखेरच्या तीन दौऱ्यामध्ये कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याने अखेर 2007 साली कसोटी मालिका जिंकली होती. तत्पूर्वी, कपिल देव जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार होता तेव्हा भारताने इंग्लंडला त्याच्या घरी 1986 मध्ये पराभूत केले होते.