गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘हिचकी’ तून राणी मुखर्जीचे पुनरागमन

अभिनेत्री राणी मुखर्जी आता ‘हिचकी’ या आगामी चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. मनीष शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दशित हिचकी हा सिनेमा बोलताना अडखळणार्‍या समस्येवर आधारित आहे. या चित्रपटाबाबत फारशी माहिती मीडियाला दिली नसली तरीही या चित्रपटाच्या पॅकअपनंतर राणीचा एक खास फोटो ट्विट करण्यात आला आहे.
 
फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने राणीचे फोटो शूट केले आहे. तिचा एक फोटो शेअर करताना त्याने खास संदेशही  आहे. 2 २०१५ साली राणी आणि आदित्य चोप्राच्या आयुष्यात एका गोंडस परीचे आगमन झाले. त्यानंतर राणी काही काळ सिनेमांपासून दूर राहिली. पण आता पुन्हा नव्या जोमाने ती पुनरागम करण्यास सज्ज झाली आहे.