बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'जूली 2' मध्ये मी खूपच अश्लील सीन केला आहे: राय लक्ष्मी

बोल्ड फिल्म 'जूली 2' लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. ही 2004 साली आलेल्या चित्रपट 'जूली' चा सीक्वेल आहे ज्यात मुंबईत राहणार्‍यासाठी एका मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात येते. यात नेहा धूपिया मुख्य भूमिकेत होती. तसेच 'जूली 2' देखील अशीच बोल्ड आणि एक्सपोज करणारा सिनेमा आहे.
 
चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली राय लक्ष्मी हिने यात आपल्या बोल्ड सीनबद्दल मीडियात उघडपणे चर्चा केली. यात आपल्या सर्वात बोल्ड सीनबद्दल बोलताना ती म्हणाली की मला कळत नाहीये की याबद्दल सांगावे अथवा नाही, परंतू यात मी एक खूपच अश्लील सीन दिला आहे.
 
हा सीन प्रेक्षकांना वास्तविक अनुभव देण्यासाठी सामील करण्यात आला आहे. या सीनमध्ये मला इच्छाविरुद्ध एका माणसासोबत बेडवर जावं लागतं. हा सीन आणि त्याचा शूट करण्याचा प्रकार फारच वाईट होता. मी मुळीच कम्फर्टेबल नव्हते. अजून ही ते काय होतं विचार करून विचित्र वाटतं. पर्सनली मला वाटतं की असे सीन आणि एक्स्पोजर काही लोकांनीच करावे कारण प्रत्येक कलाकार असे सीन करायला कधीच तयार होणार नाही.
 
जूली 2 यात राय लक्ष्मी व्यतिरिक्त रवी किश्श्यानं, अनंत जोग आणि आदित्य श्रीवास्तव सामील आहे. सीबीएफसीचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचा सिनेमा 'जूली 2' चे ट्रेलरने अनेक लोकांना आकर्षित केले आहे.
 
काही वाद असल्यामुळे याची रिलीज टळत गेली परंतू आता हा सिनेमा 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.