गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

करणी सेनेचा दीपिकाला इशारा, नाक कापण्याची दिली धमकी

‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणला दिला आहे. सोबतच सिनेमा प्रदर्शित झाल्यास १ डिसेंबर रोजी भारत बंदचा इशाराही दिला असून फक्त राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या सिनेमाच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. या सिनेमाचे ट्रेलर ज्या चित्रपटगृहांत दाखवले जातील, तिथे जाळपोळ करु, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

याआधी काहीही झाले तरी ‘पद्मावती’ सिनेमा ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित केला जाईल या दीपिकाच्या वक्तव्यावर महिपाल यांनी ही धमकी दिली. काही राज्यांमध्ये पद्मावती सिनेमा प्रदर्शित करु न देण्याचे म्हटले जात असताना दीपिकाने एका मुलाखतीत या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले होते.