बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेता आकाश ठोसर लवकरच बॉलिवूडमध्ये

अभिनेता आकाश ठोसर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटेसोबत आकाश झळकणार असल्याचं कळतंय. आकाश यात राधिकाच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे.

गेल्या आठवड्यातच त्याची शूटिंग पूर्ण झाली. यामध्ये चार लघुकथा असून चार वेगवेगळे दिग्दर्शक या लघुकथांचं दिग्दर्शन करणार आहेत. तर आकाश आणि राधिकाच्या कथेचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. विशेष म्हणजे ही लघुकथा राधिकाने स्वत: लिहिली आहे.

रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.