रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (10:25 IST)

'पुष्पा' सिनेमातील कलाकारांनी मानधन किती घेतलं?

सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 300 कोटीहून अधिक कमाई केली. यासाठी दोघांनीही कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित या सिनेमाने 300 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. कोरोना काळात बॉक्स ऑफीसवर केलेली ही कमाई नवीन विक्रम मानला जात आहे.
 
अल्लू अर्जुनने या सिनेमासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचा दावा केला जात आहे. तर रश्मिकाने 5 ते 10 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं सांगितलं जातं.

खलनायकाच्या भूमिकेत दिसलेला मल्याळम अभिनेता फहाद फासिल यानेही या सिनेमासाठी साडे तीन कोटी रुपये मानधन घेतलं आहे.