बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:54 IST)

वामिका ही विराट कोहलीची ‘झेरॉक्स कॉपी’

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिकाची झलक चाहत्यांना पहिल्यांदा पाहायला मिळाली. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊनमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वामिकासह टीम इंडियाला चिअर करताना दिसली. विराटने अर्धशतक झळकावले तेव्हा वामिका अनुष्काच्या मांडीवर टाळ्या वाजवताना दिसली.
 
वामिका नुकतीच एक वर्षाची झाली आहे. 11 जानेवारीला त्यांचा वाढदिवस होता. विराट कोहलीचे चाहते पहिल्यांदाच वामिकाची झलक पाहण्यासाठी उत्साहित झाले आणि त्यांनी ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला. वामिकाला पाहिल्यानंतर चाहत्यांनी सांगितले की, ती थेट वडिलांवर गेली आहे. काहींनी तिला विराट कोहलीची ‘झेरॉक्स कॉपी’ म्हटले.