बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (09:09 IST)

प्रियांका चोप्रा - निक जोनास झाले आईबाबा, सोशल मीडियावरून केली घोषणा

सरोगसीच्या माध्यमातून आपण आणि निक जोनस आईबाबा झाल्याचं बॉलिवुड आणि हॉलिवुडची अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावरून जाहीर केलंय.
 
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील बनल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात आता प्रियंका चोप्राच्या नावाचाही समावेश झाला आहे.
 
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे सेलिब्रिटी दाम्पत्य सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील बनले आहेत. दोघांनीही सोशल मीडिया माध्यमातून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली.
 
सरोगसीच्या माध्यमातून बाळाचा जन्म झाला असल्याचं प्रियंका आणि निक या सेलिब्रिटी कपलनं सांगितलं आहे. मात्र त्यांच्या घरी आलेला नवा पाहुणा मुलगा आहे की मुलगी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
लग्नाच्या तीन वर्षांनंतर बनले आई-वडील
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी डिसेंबर 2018 मध्ये पारंपरिक भारतीय पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी ते आई वडील बनले आहेत.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांत विविध प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता त्या सर्वांना पूर्णविराम मिळाला आहे.

सरोगसीच्या माध्यमातून आई वडील बनल्यानंतर कुटुंबाबरोबर हे आनंदाचे क्षण अनुभवत असून त्यासाठी सर्वांनी आपल्याला प्रायव्हसी द्यावी अशी विनंती दोघांनी सोशल मीडियाद्वारे केली.
 
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018मध्ये निक जोनाससोबत लग्न केलं होतं. राजस्थानमधल्या जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये या दोघांच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला होता.
 
निक म्हणजेच निकोलस जेरी जोनास हा अमेरिकन गायक, अभिनेता आणि रेकॉर्ड प्रोड्युसर आहे. वयाच्या 7व्या वर्षी त्याने अभिनयाला सुरुवात केली होती.