बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 22 जानेवारी 2022 (12:18 IST)

नम्रता शिरोडकर वाढदिवस विशेष : नम्रता तिच्या करिअरच्या शिखरावर असताना महेशबाबूच्या प्रेमात पडली

Namrata Shirodkar Birthday Special: Namrata fell in love with Maheshbabu at the peak of her career नम्रता शिरोडकर वाढदिवस विशेष :  नम्रता तिच्या करिअरच्या शिखरावर असताना महेशबाबूंच्या प्रेमात पडली Bollywood Gossips Marathi Bollywood Marathi  In Webdunia Marathi
अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज 22 जानेवारी रोजी  तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. नम्रताने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. 1993 मध्ये तिने मिस इंडियाचा ताज जिंकला होता. तिने 1998 मध्ये 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्या सोबत सलमान खान आणि ट्विंकल खन्नाही मुख्य भूमिकेत होते. याशिवाय नम्रताने कच्चे धागे, आग, वास्तव, अलबेला, मसीहा यासह अनेक  हिट चित्रपट केले. 'प्राइड अँड प्रिज्युडिस' या इंग्रजी चित्रपटातही या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविले.
 
नम्रता तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिची भेट साऊथचे  सुपरस्टार महेश बाबूशी झाली आणि ती त्यांच्या प्रेमात पडली. 2000 मध्ये 'वंशी'च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. नंतर नम्रताने चित्रपट जगतापासून स्वतःला लांब केले. आता ती घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. 2004 मधला 'रोक सको तो रोक लो' हा तिचा  शेवटचा चित्रपट होता. नम्रता आणि महेश हे दोन मुलांचे सितारा आणि गौतम चे पालक आहे.