सुशांत सिंह राजपूतचे शेवटचे काही तास कसे होते?

sushant singh rajput
Last Modified शनिवार, 12 जून 2021 (18:00 IST)
मधु पाल वोहरा
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला येत्या 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होईल. सुशांत वांद्र्याच्या ज्या भाड्याच्या घरामध्ये राहात होता, त्याच फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केली होती.
टीव्ही मालिकेत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सिनेजगतामध्येही चांगलं नाव कमावणाऱ्या सुशांतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली.

सुशांतचा मुंबईत स्वतःचा एक फ्लॅट होता. पण त्याला मोठ्या घरात राहायचं होतं, म्हणून तो वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये निधनाच्या आधी आठ महिन्यांपासून राहात होता. या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहात नसे.
त्याच्याबरोबर त्याचे क्रिएटिव्ह मॅनेजर, त्याचा एक मित्र आणि जेवण करणारा एक नोकरही राहात होता. रविवार (14 जून 2020) ची सकाळ सुशांतच्या आयुष्यातली शेवटची सकाळ असेल असा या घरात राहाणाऱ्या कोणीही विचार केला नव्हता. सुशांत सिंहच्या नोकराने पोलिसांना सांगितले, सकाळपर्यंत सर्व काही ठीक होतं.
सकाळी 6.30 वाजता सुशांत उठला होता. 9 वाजता त्याला डाळिंबाचा रस दिला आणि तो त्याने प्यायलाही होता. त्यानंतर 9 वाजता सुशांतने बहिणीशी गप्पा मारल्या. त्यानंतर अभिनयाची कारकीर्द ज्याच्या बरोबर सुरू केली त्या महेश शेट्टीशीही त्याने फोनवर संवाद साधला. हे दोघे एकता कपूरच्या किस देश मे होगा मेरा दिल मालिकेत होते. दोघेही चांगले मित्र होते. सुशांतने शेवटचा फोन त्यालाच केला.
त्यानंतर तो खोलीत गेला आणि आतून लॉक करुन घेतले. सकाळी 10 वाजता जेवणाबद्दल विचारायला गेल्यावर सुशांतने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दोन तीन तासांनी मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहीण आल्यावर कुलूप उघडणाऱ्या माणसाला बोलावण्यात आलं आणि दरवाजा उघडला.
त्यानंतर त्यांना जे दृश्य समोर दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांच्या मते सुशांतचा मृत्यू सकाळी 10 ते दुपारी 1 च्या मध्ये झाला असावा. त्याचा मृतदेह पाहून नोकराने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला त्याच्या मृत्यूची बातमी दोन वाजता मिळाल्याचे सांगितले. पोलीस 2.30 वाजता त्याच्या घरी पोहोचले आणि तपास सुरू केला.
पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्याच्या मृतदेहाला संध्याकाळी साडेपाच वाजता आरएन कूपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर पोस्ट मार्टेम होईल. मुंबई डीसीपी झोन-9 च्या अभिषेक त्रिमुखे यांनी म्हटलं आहे की पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यावरच योग्य कारण सांगता येईल.

अद्याप कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. सुशांत राजपूत 34 वर्षांचा अभिनेता होता. त्याने आपल्या अभिनयाद्वारे बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

शेहनाजचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल, डोळ्यातून अश्रु ...

शेहनाजचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल, डोळ्यातून अश्रु वाहतील
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आकस्मिक निधन सर्वांसाठीच धक्कादायक होतं. या घटनेमुळे त्याचे ...

उजव्या हातात मोबाईल असे लिही

उजव्या हातात मोबाईल असे लिही
उजव्या हातात मोबाईल असे लिही मुलगी-आई,ऍडमिशन फॉर्मवर

भीती

भीती
एक मनुष्य सांगत होता… मला आयुष्यभर भीती वाटली… -प्रथम पालकांची

'एक थी बेगम २' ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर

'एक थी बेगम २' ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर
प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडते. परंतु सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही ...

राज बाहेर आल्यानंतर शिल्पाची पोस्ट व्हायरल

राज बाहेर आल्यानंतर शिल्पाची पोस्ट व्हायरल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी ...