मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (12:57 IST)

हम दो तीन चार या वेब सिरिज चा अमेझॉन मिनी टीव्हीवर प्रीमियर

सुमुखी सुरेश आणि बिस्व कल्याण रथ तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहेत कारण त्यांची वेब-सिरीज हम दो तीन चार या वेब सिरिज चा अमेझॉन मिनी टीव्हीवर प्रीमियर होणार आहे आणि तुम्ही अगदी मोफत याचा आस्वाद घेऊ शकता.
 
OML द्वारे तयार केलेल्या या शो चा प्रीमियर 29 मार्च रोजी अमेझॉन मिनी टीव्हीवर वर होईल. अमेझॉन मिनी टीव्ही ने आज त्यांच्या आगामी स्लाईस ऑफ लाइफ वेब-सिरीज ‘हम दो तीन चार’ च्या प्रीमियरची घोषणा केली ज्यामध्ये लोकप्रिय कलाकार - सुमुखी सुरेश आणि विश्व कल्याण रथ मुख्य भूमिकेत आहेत. OML द्वारे निर्मित, 'हम दो तीन चार', एका पती-पत्नीची कथा आहे जिथे नायक पूर्वीच्या काही व्यवसायातून मार्ग काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो आणि नंतर तो एक पोलीस हवालदार असतो, ज्याचे आयुष्य तिच्या नोकरी आणि त्यांच्या दोन मुलांच्याभोवती फिरते. शोचे पहिले चार भाग 29 मार्च रोजी अमेझॉन मिनी टीव्हीवर वर प्रदर्शित केले जातील आणि त्यानंतर दर मंगलवार आठवड्याला एक भाग प्रदर्शित केला जाईल. विविध भाग प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित असलेल्या स्लाईस ऑफ लाइफ प्रेक्षकांना सादर करतात.
 
अभिनेत्री, सुमुखी सुरेश म्हणाली . “मी खूप उत्साहित आहे की मला शेवटी विश्व कल्याण रथ यांची
निर्मिती असलेल्या रचनेमध्ये काम करायला मिळाले! विशेषत: प्रशस्ती, रोहन देसाई आणि बिस्वा या
लेखकांनी एक मजेशीर आणि उत्तम स्क्रिप्ट लिहिल्यामुळे हम दो तीन चार हा माझ्यासाठी एक
चांगला अनुभव होता. आम्हाला आधीच माहित आहे की हा शो हिट होणार आहे कारण लोकप्रिय 
स्ट्रीमिंग सेवा याला पाठिंबा देत आहे.”
 
”अभिनेता, विश्व कल्याण रथ म्हणाला-“मला नेहमीच संबंधित कथा सांगणाऱ्या प्रकल्पांचा भाग व्हायला आवडते आणि हम दो तीन चार हे अगदी तेच आहे. ह्या वेबसिरिज ची कथा अशी आहे जी संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे बसून बघू शकते व त्याचा मनापासून यांना आनंद लूटू शकते. 29 मार्च 2022 पासून अॅमेझॉन मिनीटीव्हीवर याचा प्रीमियर होईल तेव्हापासूनच प्रेक्षक या शोशी जोडले जातील आणि त्याबद्दल मला खात्री आहे,”
 
‘हम दो तीन चार’चा प्रीमियर 29 मार्च रोजी अमेझॉन शॉपींग अॅपमधील अमेझॉन मिनी टीव्ही वर खास प्रसारित केला जाईल. हा शो ह्यापवर पूर्णपणे विनामूल्य प्रवाहित केला जाणार असून, कोणत्याही सशुल्क सदस्यतेची आवश्यकता नाही.