मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (12:47 IST)

ऑस्कर 2022: ऑस्कर सोहळ्यात लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा उल्लेखही केला गेला नाही

ऑस्कर 2022 च्या इन मेमोरिअम विभागात, जगभरातील कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ज्यांना सिने सृष्टी उद्योगाने गमावले आहे. यामध्ये सिडनी पॉईटियर, बेट्टी व्हाईट, इव्हान रीटमन आणि स्टीफन सोंदहेम सारख्या स्टार्सचा समावेश होता. मात्र, या विभागात कुठेही जगप्रसिद्ध दिवंगत भारतीय गायिका लता मंगेशकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांचा उल्लेख केला गेला नाही. नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हटल्या जाणार्‍या लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला.
 
सोशल मीडियावर लतादीदींचे चाहते संतापले ऑस्कर 2022 मध्ये लता मंगेशकर यांचे नाव न घेतल्याने त्यांचे चाहते सोशल मीडियावर चांगलेच संतापले होते. एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले की, 'लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ऑस्करमध्ये दाखविल्या गेलेल्या चित्रपटात एकूण गाण्यांपेक्षा जास्त गाणी गायल्याचा रेकॉर्ड केल्याचा उल्लेख देखील केला नाही. ऑस्कर त्यांना ही आदरांजली वाहण्यास पात्र समजत नाही का?'
 
सोशल मीडियावर लता मंगेशकर यांच्या चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या वर्षी 6 फेब्रुवारीला लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. कोविड आणि न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना  मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर वयाच्या 13 व्या वर्षापासून गात होत्या. इंडस्ट्रीला पुढे नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते.