शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (13:02 IST)

आयकर विभागाचा दावा - सोनू सूदने 20 कोटींपेक्षा जास्त कर चोरी केला

Income tax department claims - Sonu Sood evaded more than Rs 20 crore Bollywood Marathi News IN Marathi Webdunia Marathi
आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदवर छाप्याबाबत मोठा खुलासा केला आहे. विभागाचे म्हणणे आहे की सोनू सूद 20 कोटींपेक्षा जास्त टेक्स चोरी मध्ये गुंतला आहे.आयकर विभागाने सलग तीन दिवस अभिनेत्याच्या मुंबईतल्या घराचे सर्वेक्षण केले.
 
विभागाने म्हटले आहे की सूदने परदेशी देणगीदारांकडून 2.1 कोटी रुपये नफा मिळवला आहे, जे अशा व्यवहारांना नियंत्रित करणाऱ्या कायद्याचे उल्लंघन आहे. आतापर्यंतच्या तपासात, अशा 20 नोंदी सापडल्या आहेत, त्यातील देणाऱ्यांनी फसवणूक केल्याचे कबूल केले. रोख रकमेऐवजी धनादेश देण्याचेही त्यांनी मान्य केले. सीबीडीटीनुसार, मुंबई,लखनौ,कानपूर,जयपूर,दिल्ली आणि गुरुग्रामसह एकूण 28 परिसरांवर छापे टाकण्यात आले.