मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जग्गा जासूसच्या सेटवर कतरिना कैफ जखमी

jagga jasus
‘जग्गा जासूस’ सिनेमाचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात असतानाच अभिनेत्री कतरिना कैफ सेटवर जखमी झाली. शूटिंगदरम्यान जड वस्तू पडल्याने तिच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. डॉक्टरांनी कतरिनाला पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ‘जग्गा जासूस’च शूटिंग थांबवण्यात आलं आहे. बरी झाल्यानंतर कतरिना पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करेल. दरम्यान या दुखापतीमुळे ‘झी सिने अवॉर्ड्स’ मध्ये कतरिना कैफच्या चाहत्यांना तिचा डान्स पाहता येणार नाही. ती परफॉर्म करणार नाही.