शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज सोबत

jastin bibar

जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या म्युझिकल कॉन्सर्टला मलायका अरोरा आणि अरबाज खान दोघे एकत्र आले होते. अरबाज आणि मलायकामधील पती-पत्नीचे नाते संपुष्टात आले असले तरी दोघांमध्ये मैत्रीचे नाते अजूनही टिकून आहे. दोघांचा 14 वर्षांचा मुलगा अरहानही त्यांच्यासोबत होता. मलायका तिच्या नेहमीच्या हॉट लूकमध्ये दिसत होती तर अरबाजने ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. मागच्यावर्षी मलायका आणि अरबाजमधील 18 वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले.