मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (10:49 IST)

जॉनी लीव्हरला वयाच्या 13 व्या वर्षी आत्महत्या करायची होती

johnny Lever
जेव्हा चित्रपटांमध्ये कॉमेडी किंगचा विचार केला जातो, तेव्हा जॉनी लीव्हरचे नाव  पहिले येते. गोविंदा, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि शाहरुख इत्यादी अनेक अभिनेत्या सोबत चित्रपटात काम करूनही जॉनी लीव्हरने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगाला हसवणाऱ्या जॉनी लिव्हरचा प्रवास इतका सोपा नव्हता. एक काळ असा होता की जॉनी लीव्हरला स्वतःला संपवायचे होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी जॉनी लीव्हरला आत्महत्या करून जगाचा निरोप घ्यायचा होता.
 
लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी .आम्ही तुम्हाला कॉमेडी किंग जॉनी लीव्हरच्या आत्महत्येची कथा आणि त्यातून तो कसा बाहेर पडला याबद्दल सांगणार आहोत.
 
जॉनी लीव्हर अतिशय गरीब कुटुंबातून आलेला आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जॉनीचे संपूर्ण कुटुंब मुंबईतील एका चाळीत राहत होते. त्यांचे वडील प्रकाश राव हे एका खाजगी कंपनीत कामाला होते. जॉनीच्या वडिलांना दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे त्याने कमावलेले बहुतांश पैसे दारूवर खर्च करायचे.

कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी तरुण वयातच काम करायला सुरुवात केली. एके दिवशी, त्याच्या आर्थिक समस्यांशी झुंजत, जॉनी लीव्हरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मरण्यासाठी ते  रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडून ट्रेन येण्याची वाट पाहू लागला. तथापि, नशिबात काहीतरी वेगळेच होते.
 
जेव्हा तो मृत्यूला कवटाळण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पडून असताना तेव्हा त्याने डोळे मिटले होते. त्याला मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पहायचा नव्हता. जॉनी लीव्हर डोळे मिटून रेल्वे रुळावर पडून ट्रेन येण्याची वाट पाहत होता, तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे चेहरे त्याच्यासमोर दिसू लागले आणि त्याने लगेचच ट्रॅकवरून उठून आपला मृत्यूचा बेत रद्द केला.
 
तरुण वयात एवढा मोठा निर्णय घेणारा जॉनी लीव्हर म्हणतात की, निराश होणे आणि कोणत्याही गोष्टीसाठी हताश होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु आत्महत्या कधीच करू नये. कॉमेडी किंग म्हणतो की आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंब आणि मित्रांचा विचार करणे आवश्यक आहे. 
 
जॉनी  सांगतात नन्तर ते एका दुकानावर गेले तिथे गाणे वाजत होते. ते गाणे मैं तो तुम संग नैन मिलाके होते.गाणं ऐकल्यावर सर्व टेन्शन दूर झालं. गाण्यामुळे माझे टेन्शन कमी होते. संगीतात खूप ताकद आहे. हे मला समजलं या मुळे  मला जगणे शिकवले. मला दुसरं जन्म संगीताने मिळाला. 
 
 Edited by - Priya Dixit