सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (10:48 IST)

जूही चावला वाढदिवस विशेष : हैप्पी बर्थ डे जूही

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 रोजी लुधियाना पंजाब येथे झाला. जूही या 13 नोव्हेंबर रोजी तिचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी या खास दिवशी त्यांच्या चाहत्यांना वाढदिवस भेट म्हणून झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक लिंक शेअर केली आहे या मध्ये आपण 42 रुपये देऊन एक रोपटे लावू शकता. जूहीचे म्हणणे आहे की हे आपल्या पृथ्वी आणि आपल्यासाठी चांगले उपक्रम आहे.  त्या एक चांगल्या अभिनेत्री असून एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. त्यांनी अनेकवेळा पर्यावरण सुधारण्याच्या मोहिमेत सक्रियरित्या भाग घेते आणि पर्यावरण मोहीम राबवते. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांना वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचे आवाहन केले आणि लिहिले, "प्रिय मित्रांनो, उद्या माझा वाढदिवस आहे. मला माहित आहे की आपण आपल्या शुभेच्छा मला देत आहात आणि या दिवसाची वाट पाहत होता .मला शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यसाठी ! मी गम्मत करत आहे.. मला भेटवस्तू नको.. आपण मला शुभेच्छा सह किमान एक रोपटं तरी लावावे मी इथे लिंक शेअर करत आहे. (https://www.ishaoutreach.org/en/cauvery-calling/campaigns/cauvery-calling-action-now-juhichawla) प्रतिरूप 42 रुपये, आपण हवी तेवढी झाडे लावा माझ्यासाठी नाही तर हे आपल्या पृथ्वीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या सर्वांसाठी अवश्य लावा.खूप खूप प्रेम .''
जूही यांनी 1984 साली मिस इंडिया खिताब पटकावला. त्या नंतर त्यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. 1988 मध्ये आमिर खान सह 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली. यानंतर तिने हम हैं राही प्यार के, डर, इश्क, माय ब्रदर निखिल इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले. 2019 मध्ये ती सोनम कपूर आणि राजकुमार राव अभिनित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटात दिसली. या मध्ये अनिल कपूर प्रमुख भूमिकेत होते. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा