रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (12:19 IST)

काजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट!

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही या चित्रपटाला मिळत आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा काजोलने आपल्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार्‍या काजोलचे जर कुणी चित्रपट पाहत नसेल तर, ते खुद्द तिचीच मुले न्यासा आणि युग हे आहेत. याबाबत खुलासा खुद्द काजोलनेच केला आहे. काजोलने हा खुलासा नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये केला आहे. तिने सांगितले, की माझे चित्रपट माझ्या दोन्हीही मुलांना आवडत नाहीत. माझे चित्रपट ते कधीच पाहात नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, मी माझ्या चित्रपटात फार रडते. त्यांना मला गोलमाल सारख्या चित्रपटात पाहायचे असते. तिच्या चाहत्यांना काजोलच्या या खुलाशाने नक्कीच आश्चर्य वाटेल. अजय देवगणबाबतही काही दिवसांपूर्वी तिने सांगितले होते, की तिचा लोकप्रिय ठरलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट अजयने अजूनही पाहिला नाही. याचे कारण मात्र त्याने अद्याप सांगितलेले नाही. दरम्यान काजोलच्या 'हेलिकॉप्टर ईला' चित्रपटाने दोन दिवसात 1.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. विकेंडच्या शेवटी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.