गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (18:10 IST)

कमबख्त इश्क चित्रपटाचे 12 वर्ष पूर्ण

Kamabakhta Ishq completes 12 years of film
कमबख्त इश्क हा बॉलिवूडचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे,ज्याचे दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केले असून साजिद नाडियाडवाला निर्मित आहे. हा चित्रपट 2002 च्या तामिळ चित्रपटावरआधारित' पम्मल के संबदाम' वर आधारित आहे. 
 
या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असून आफताब शिवदेसानी आणि अमृता अरोरा या सहायक भूमिकेत आहेत. हॉलिवूड अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन ,डेनिस रिचर्ड्स, ब्रॅंडन रूथ आणि होली व्हॅलेन्स स्टार देखील केमियो भूमिकेत आहेत. 
 
हा चित्रपट डिसेंबर 2008 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कामाच्या विस्तारामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आणि 3 जुलै 2009 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.आज या चित्रपटाला 12 वर्ष पूर्ण झाले आहे.