बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018 (08:40 IST)

कंगना वाढवणार 10 किलो वजन

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाराणावत ही जोखी पत्करायला घाबरत नाही. मग ती रिअल लाईफ असो की रिल लाईफ. भूमिका कितीही आव्हानात्क असो, कंगना ती स्वीकारते आणि केवळ स्वीकारतच नाही तर त्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करते. लवकरच कंगना 'पंगा' या चित्रपटात दिसणार आहे. यात कंगना हिला कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिकाही कंगनासाठी आव्हानात्क आहे. कारण या भूमिकेसाठी तिला थोडे थोडके नव्हे तर तब्बल 10 किलो वजन वाढवावे लागणार आहे. बरेली की बर्फी, नील बट्टे सन्नाटा फेम दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. न्यूयॉर्कमधील सुटीवरून परतताच कंगना 'पंगा'साठी तयारी सुरू करेल कबड्डी हा खेळ कंगनाला माहीत आहे. पण प्रोफेशनल खेळाडू दिसण्यासाठी तिला काही प्रशिक्षणाची गरज आहे. लवकरच कंगना यासाठीच्या प्रशिक्षणास सुरुवात करेल. याच काळात ती आपले 10 किलो वजनही वाढवेल. सध्या कंगना हाय कॅलरी प्रोटीन डाएटवर आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अलीकडे  अश्विनीने या चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देणारा व्हिडिओ जारी केला होता. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.