राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय यांचं रस्ते अपघातात निधन, अवयव दान करणार

sanchari vijay
Last Modified सोमवार, 14 जून 2021 (15:29 IST)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कन्नड अभिनेते संचारी विजय यांचं बाईक अपघातामध्ये निधन झालं आहे.
३७ वर्षी विजय यांचा शनिवारी बाईकवरुन प्रवास करताना बंगळुरू जवळ अपघात झाला होता. या अपघातामध्ये विजय यांना गंभीर दुखापत झाली होती. यात त्यांच्या मेंदूला जबरदस्त जखम झाली होती. नंतर उपचारादरम्यान संचारी विजय यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर त्यांना त्वरीत एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. संचारी विजय यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या मेंदू मृत झाल्याची घोषणा केली, ज्यानंतर विजय यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विजय यांना बाईकवरुन प्रवास करण्याची आवड होती. ते 12 जून रोजी एका मित्राच्या घरून परत येत असताना वाटेत त्यांच्या दुचाकीची अपघात झाला. या अपघातात संचारी यांना गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलग 48 तास तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे त्यांच्यावर उपचार सुरु होते. संचारी यांना अनेक गंभीर दुखापत झाल्याने त्यांचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी 14 जूनला अभिनेता ब्रेन डेड घोषित केले.
त्याच्या निधनानंतर संचरीच्या कुटुंबियांनी अभिनेत्याच्या शरीराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयचे चाहते आणि सिनेसृष्टीतील लोक सोशल मीडियावर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहात आहेत. संचारी विजयच्या छायाचित्रांद्वारे त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. दुसरीकडे काही सोशल मीडिया वापरकर्ते 14 जून ही तारीख अनलकी असल्याचेही पोस्ट करत आहे कारण मागील वर्षी याच तारखेला सुशांतसिंग राजपूत यांनी जगाला निरोप दिला होता.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule Tourism
गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे, ज्यामध्ये प्राचीन ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि इतर स्पर्धक कोण?
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ ...

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि इतर स्पर्धक कोण?
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ...

आणि रमेश पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी वकिला कडे जातो

आणि रमेश पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी वकिला कडे जातो
रमेश वकिलाला -साहेब,मला माझ्या बायकोपासून घटस्फोट पाहिजे