गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 7 डिसेंबर 2022 (19:10 IST)

केजीएफ फेम ज्येष्ठ अभिनेते कृष्णजी राव यांचे निधन

केजीएफ दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते कृष्णा जी राव यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले आहे. ते रुग्णालयात ICU मध्ये उपचार उपचाराधीन होते. कृष्णा जी राव यांनी KGF आणि KGF Chapter 2 या दोन्ही चित्रपटात काम केले.
 
कृष्णा जी यांना आजारपणामुळे राव यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा मृत्यू झाला. यश नावाने प्रसिद्ध असलेले कृष्णाजी राव यांना बेंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
तुमकूर येथील पावागडा येथील रहिवासी असलेले कृष्णाजी राव हे त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले असता त्यांची प्रकृती खालावली. त्याच्यावर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राण ज्योत मालवली.केजीएफ दादा म्हणून ओळखले जात होते.  
 
Edited by - Priya Dixit