नव्या पर्वाच्या निमित्ताने महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांच्या साथीने काही नवे चेहरे पाहण्याची संधी सुद्धा प्रेक्षकांना मिळणार आहे. अनंत देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि जमनादास मजीठिया यांचे विनोदी कुटुंब पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कलाकारांशिवाय आणखी काही जण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यामध्ये रेणुका शहाणे, रत्ना पाठक शहा आणि दिप्शिका नागपाल या अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे.