गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (14:34 IST)

KK ला लग्नात गायला आवडत नव्हते, करोडोच्या ऑफर्स नाकारल्या

KK
लग्नांमध्ये नाचण्यासाठी किंवा गाण्यासाठी करोडो रुपये फी घेणारे अनेक कलाकार आहेत, पण दुसरीकडे केकेसारखे गायक आहेत ज्यांना ते कधीच आवडले नाही.
 
एका मुलाखतीत केकेला विचारण्यात आले की, तो इतर गायकांप्रमाणे लग्नसोहळ्यात का गात नाही? तेव्हा केकेने सांगितले की, त्याला अनेक ऑफर्स येतात. करोडो रुपयांचे आमिष दाखवले जाते पण ते आवडत नाही म्हणून ते गात नाहीत.
 
खरंतर केके ही खाजगी व्यक्ती होती. कॅमेऱ्यासमोर येणंही त्याला आवडत नव्हतं. त्यांचा असा विश्वास होता की गायकाला दिसण्याची गरज नाही. गायक ऐकले जाणे महत्वाचे आहे. फक्त त्याचे गाणे त्याचे काम करेल. यामुळेच केकेचा चेहराही लोकांना फारसा दिसत नव्हता.
 
त्यामुळे केकेला अभिनय कधीच आवडला नाही. बॉलीवूडचे कलाकार किंवा गायक प्रसिद्धीझोतात येण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर केके सारखे कलाकार आहेत जे आपले काम शांतपणे करत असत.