बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (21:13 IST)

केके मेनन यांचा रिचा चड्ढाच्या ट्विटवर पलटवार

अभिनेत्री रिचा चड्ढाने काही दिवसापुर्वी केलेल्या आणि नंतर हटविलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये केके म्हणाले की, भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल ‘प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करू शकतात. रिचा चढ्ढा हिने काही दिवसापुर्वी गलवान खोऱ्या संबंधित एक वादग्रस्त विधान केले होते. त्या ट्विटवर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्यावर नंतर तिने ती पोस्ट हटवली.
 
उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत मिळवण्यासाठी भारतीय सैन्य “सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहे” या विधानाला उत्तर देताना रिचाने ट्विटरवर “गलवान हाय म्हणतो” अशी टिप्पणी केली होती.
 
त्यानंतर अभिनेता केके मेनन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली आहे, त्यात ते म्हणतात कि, “देशाचे शूर जवान आपल्या गणवेशात देशाच्या प्रत्येक नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपले जीवन पणाला लावतात! आपण निदान त्यांच्याविषयी प्रेम, आदर आणि कृतज्ञता आपल्या हृदयात ठेवू शकतो. #जयहिंद! वंदे मातरम.”
Edited by : Ratnadeep Ranshoor