गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

केआरकेने ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी दिली धमकी

अभिनेता कमाल आर खान माध्यमांसाठी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. या पत्रकात आपले अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. 

या प्रसिद्धिपत्रकात त्याने लिहिलंय की, ‘१५ दिवसांच्या आत माझे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मी @Twitterindia आणि महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना विनंती करतो. आधी त्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि एकेदिवशी अचानक माझे अकाऊंट बंद केले. त्यांनी माझी अशी फसवणूक केल्याने मी निराश झालोय. माझे अकाऊंट सुरु केले नाही तर मी आत्महत्या करेन आणि यासाठी हे लोक जबाबदार असतील.’ असे म्हटले आहे.
 
याआधी केआरकेने वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले आहे.