गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (16:18 IST)

सोनमला झाला श्वसनाचा विकार

सोनम कपूरला ब्राँकायटिस आजाराने ग्रासले आहे. याबाबत सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आजाराबद्दल अधिक माहिती दिली. पर्यावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सोनमला श्वास घेण्यास त्रास होत आहे.  ट्विटमध्ये सोनम म्हणाली की, मला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे. हा आजार फार भयंकर आहे.

एवढेच नाही तर अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टलाही सोनमने रिट्विट केले आहे. रिचाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, कोणाला मुंबईच हवामान दूषित झाल्यासारखं वाटतंय का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास अवघड जातंय. असं वाटतंय की आपण पावडर खातोय.