मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (15:50 IST)

दीपिका ठरली पहिली भारतीय महिला ब्रँड अॅम्बेसेडर

दीपिका पदुकोण आता Levi's ग्लोबल ब्रँडची अॅम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रँडच्या मते दीपिका ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याने ते महिलांना त्यांच्या ब्रँडकडे आकर्षित करू शकतील. दीपिका ही भारतातील या ब्रँडचा चेहरा बनणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे. दीपिका आता Levi's या नवीन ब्रँडच्य माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे.
 
यामध्ये सामील झाल्यानंतर दीपिकाने तिचा फोटोही शेअर केला आहे. या व्यतिरिक्त दीपिकाला या ब्रँडशी जोडल्यानंतर Levi's ने तिच्यासाठी एक पोस्टही शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ट्रोलरचा क्लास एकानं सोशल मीडियावर दीपिकाला अपमानजनक मेसेज केला होता. दीपिकानं त्या ट्रोलरचा चांगलाच क्लास घेतला आणि त्याचा मेसेज सर्वांसमोर शेअर केला. या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना दीपिकानं लिहिलं की, ‘हा मेसेज पाहून तुमच्या कुटुंबीयांना अभिमान वाटेल.' वर्कफ्रंटबद्दल बोललं तर दीपिका सध्या मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे. ती सध्या शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. त्याचबरोबर कबीर खान दिग्दर्शित 83 मध्ये रणवीर सिंगसोबत ती झळकणार आहे.