1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (11:36 IST)

घरात बसून महेश मांजरेकरांनी तयार केली कोरोनावर शॉर्टफिल्म

Mahesh Manjrekar
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लोक घरीच आहेत. भारतामध्येही 25 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व कलाकार घरात बसून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. पण कलाकार घरात बसून देखील शॉर्टफिल्म तयार करत आहेत. नुकताच अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते  महेश मांजरेकरांनी देखील घरात बसून कोरोनावर आधारित शॉर्टफिल्म केली आहे. ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.

फिल्मची सुरुवात ही महेश मांजरेकरांच्या मुली लॉकडाउनमुळे घरात बसून कॅरम खेळताना तर महेश हे दारू पिताना आणि धूम्रपान करताना दिसत होते. दारू आणि सिगारेट संपल्यामुळे ते आणण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या मुली प्रयत्न करत असतात. पण ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि खाली जाऊन सिगारेट-दारू घेऊन येतात. पण ते परत आल्यावर मात्र त्याचा परिणाम सर्व कुटुंबीयांवर होतो.
फिल्ममधील सईचा अभिनय पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सर्वांनाच या कठीण काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तुमचा निष्काळजीपणा किंवा छोटीशी चूक सुद्धा खूप मोठे नुकसान करुन जाऊ शकते हे वास्तव आहे. असा संदेश या शॉर्टफिल्ममधून देण्यात आला आहे.