गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (12:07 IST)

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

अभिनेत्री मलायका अरोराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायका अरोराचे वडील अनिल कुलदीप मेहता यांनी काल आपल्या घराच्या टेरिसवरून खाली उडी घेत आत्महत्या केली. यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
 
वडिलांच्या निधनाच्या वेळी अभिनेत्री पुण्यामध्ये होती. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री मुंबई मध्ये दाखल झाली. मलायका अरोराने वडिलांना श्रद्धांजली देत एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. 
 
मलायका अरोराने लिहले की, आम्हाला आमच्या प्रिय वडिलांच्या निधनाची बातमी सांगताना दुःख होते आहे. ते एक जेंटल सोल, प्रेमळ आजोबा, एक चांगले पती आणि आमचे चांगले मित्र होते. आमचे कुटुंब यावेळी धक्क्यात आहे. व आम्ही यावेळी मीडिया आणि शुभचिंतकांना गोपनीयतेचा अनुरोध करतो.