रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (11:04 IST)

मुंबईत दोन अल्पवयीन मुलींवर वडिलांनी केला लैंगिक अत्याचार

crime
मुंबई : मुंबईतीत नातेसंबंधांना लाजवेल अशी घटना समोर आली आहे. एका 52वर्षीय व्यक्तीवर आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या 18वर्षीय मुलीने फिर्याद दिली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
 
मिळालेल्या माहितीनुसार 18 वर्षीय मुलगी मुंबईतील गिरगाव  परिसरात तिच्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. पीडित मुलीवर काही महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचार झाला होता. तसेच याबद्दल बालकल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली. यानंतर मुलीला अनाथाश्रमात पाठवण्यात आले.
 
असे सांगितले जात आहे की, 18 वर्षीय पीडितेची आई तिला अनाथाश्रमात भेटण्यासाठी आली होती. तसेच मार्च महिन्यात आईने आपल्या मोठ्या मुलीला वडिलांच्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर आईने मोठ्या मुलीला सांगितले की, तिचे वडील तिच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार करतात. त्यानंतर मोठ्या मुलीनेही आपल्या आईला आपला त्रास सांगितला आणि आरोपी वडिलांनी तिच्यासोबत असेच घाणेरडे कृत्य केल्याचे सांगितले.
 
आपल्या दोन्ही मुलींच्या वडिलांनी केलेल्या लैंगिक छळाची माहिती मिळताच महिलेला खूप धक्का बसला. मोठी मुलगी अनाथाश्रमात गेल्यानंतर आरोपीने त्याच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.  
 
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मोठ्या मुलीवर 2011 पासून तिच्याच वडिलांकडून लैंगिक अत्याचार होत होता, जेव्हा ती फक्त 5 वर्षांची होती. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपी वडिलांनी दिली होती. त्यामुळे तिने अनेक वर्षे हा छळ  सहन केला. अखेर 18वर्षीय पीडितेने बाल कल्याण समितीकडे तक्रार केली आणि त्यानंतर हे प्रकरण वर्सोवा पोलिसांपर्यंत पोहोचले.
 
यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे.