1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (16:01 IST)

मार्फ्लिक्स निर्मित " फायटर " चा टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marflix हे मनोरंजनाचे पॉवरहाऊस मानलं जातं आणि या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमॅटिक चित्रपट म्हणजे फायटर साठी आता सगळेच उत्सुक आहेत. हा रोमांचक सिनेमा नक्कीच एक अनोखा अनुभव असणार असून आता त्याच्यासाठी काउंटडाउन सुरू झालं आहे. 
 
" फायटर " या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एड्रेनालाईन-चार्ज्ड चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर उद्या रिलीज होणार आहे जो अफलातून सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. चित्रपटाच्या हाय-फ्लाइंग थीमला अनुसरून Marflix ने एक गूढ रेडिओग्राम संदेश दिला जो चाहत्यांना या चित्रपटाच्या टीझर ची झलक देणारा आहे.
 
घोषणेची ही कल्पक पद्धत फायटर मध्ये असलेल्या नावीन्यपूर्णतेचे उदाहरण आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर या तिघांच्या वैयक्तिक भूमिका पोस्टर मधून बघायला मिळाल्या असून आता सगळ्यांना टीझर बद्दल उत्सुकता आहे. Marflix साठी " फायटर " हा नक्कीच खास ठरणार असून त्याच्या टीझर रिलीझ ची वाट बघायला लावणार आहे