रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (07:44 IST)

बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या चित्रपटातून एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

big boss 16
‘बिग बॉस’चं विजेतेपद जिंकल्यानंतर एमसी स्टॅन भलताच चर्चेत आला आहे. स्टॅनला अनेक ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफरही आल्या आहेत. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदने स्टॅनला चित्रपटात गाणं ऑफर केल्याची चर्चा होती. स्टॅनचे साजिद-वाजिदबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. आता स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या चित्रपटातून स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
 
एका फॅन पेजवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमुळे स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जवानच्या निर्मात्यांनी चित्रपटासाठी स्टॅनशी संपर्क साधल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. परंतु, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून अजून कोणतीही ऑफिशिअल माहिती देण्यात आलेली नाही. एमसी स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांमुळे त्याचे चाहतेही आनंदी आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor