बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (08:51 IST)

सलमान खान धमकी प्रकरणी आरोपीकडून खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना दिलेल्या धमकीच्या पत्राप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सौरभ महाकाळ आपल्या वक्तव्यानं मुंबई पोलिसांना चकवण्याचं काम करत असल्याचं दिसतंय. सौरभने चौकशीदरम्यान आतापर्यंत जी काही माहिती दिली ती खोटी असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. सौरभने चौकशीदरम्यान चुकीची माहिती दिल्याचं मुंबई पोलिसांनी बुधवारी सांगितलं. सौरभ महाकाळने दावा केला होता की, सलमानला धमकीचं पत्र पोहोचवण्यासाठी तीन लोक मुंबईतील वांद्रे बँडस्टँडवर गेले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता असं आढळून आलं की, हे तिघंही त्यावेळी कारागृहात होते. त्यामुळे ते धमकीचं पत्र देण्यासाठी जाण्याची शक्यता कमी आहे.
 
हा दावाही तपासात फोल ठरला हे तिघेजण राजस्थानचे असून पालघर येथील कारखान्यात काम करतात, पत्र देण्यासाठी ते मुंबईत आले होते, असा दावा आरोपींनी केला होता. मात्र जेव्हा पोलीस त्या कारखान्यात पोहोचले, तेव्हा त्यांना कळलं की त्यांनी तिथे कधीच काम केलं नाही. तीन ते पाच जूनपूर्वीच महाकाळ तुरुंगात असल्याचं पोलिसांना समजलं. तो अजूनही तुरुंगातच आहे.
 
पोलिसांना महाकाळच्या माहितीवर बसेना विश्वास
सौरभ महाकाळ यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवत येत नसल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात सौरभ महाकाळ याला पुणे गुन्हे शाखेने अटक केली होती. सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने महाकालची चौकशी केली होती. महाकाल हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींपैकी एक आहे.