1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (18:32 IST)

मुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबईतील एका न्यायालयाने  जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. पोर्न फिल्म बनवल्याच्या आरोपाखाली त्याला या वर्षी 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
 
एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबई कोर्टाने जे कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे.  यापूर्वी पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 1500 पानांच्या आरोपपत्रात 43 साक्षीदारांची नावे देण्यात आली होती. या प्रकरणी शिल्पाचे विधान समोर आले, जे तिने पोलिसांना दिले होते.
मुंबई पोलिसांनी 43 साक्षीदारांचे जबाब चार्टशीटमध्ये नोंदवले असल्याची माहिती शेअर केली होती. या 43 साक्षीदारांमध्ये राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्प शेट्टी आणि शर्लिन चोप्रा आहेत. त्याचवेळी शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना सांगितले की ती आपल्या कामात खूप व्यस्त होते, राज कुंद्रा काय करत होते हे माहीत नाही.