सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (15:27 IST)

काली मां पोस्टरवरून महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्याने नवा वाद

Mahua Moitra
सिगारेट पिणाऱ्या महाकाली देवीच्या पोस्टवरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच खासदार महुआ मोईत्रा यांन त्यावर टिप्पणी केली आणि तो वाद आणखी चिघळला.
 
एका टीव्ही चॅनलशी बोलताना त्या म्हणाल्या, "काली देवीचे अनेक रुपं आहेत. माझ्यासाठी काली देवी मांसाहार करणारी आणि दारूचा स्वीकार करणारी आहे. जर तुम्ही तारापीठात गेलात आणि तिथे आजूबाजूला पहाल तर तुम्हाला साधू लोक सिगारेट ओढताना दिसतील. मला वाटतं हिंदू धर्मात राहताना, काली मातेची पूजा करणारी मी हव्या त्या स्वीकार करण्याची मुभा मला मिळावी. हे माझं स्वतंत्र्य आहे आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असं मला वाटत नाही."
 
तुम्ही तुमच्या देवाला कशा पद्धतीने पाहता यावर सगळं अवलंबून आहे असं त्यांचं मत आहे. उदा. तुम्ही भूतानला जाता, सिक्कीमला जाता आणि तिथे लोक सकाळी पूजा करतात आणि देवाला दारूचा नैवेद्य दाखवतात. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी याबद्दल सांगितलं तर तुम्ही ईशनिंदा केल्याचा आरोप तुमच्यावर लागतो. असंही त्या पुढे म्हणाल्या.
 
भाजपने त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. मौईत्रा यांच्या टीएमसी पक्षानेसुद्धा त्यांच्या या वक्तव्यावरून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र टीएमसी असं करू शकत नाही असं भाजपचं मत आहे.
 
पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष म्हणाले, "जर टीएमसी या वक्तव्याचं समर्थन करत नसेल तर त्यांनी मोईत्रा यांच्यावर कारवाई करावी. त्यांनी मोईत्रा यांची हकालपट्टी करायला हवी किंवा निलंबित करायला हवं."
 
भाजपाचा महिला मोर्चा त्यांच्या या वक्तव्यांच्या विरोधात निदर्शनं करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.