मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (16:04 IST)

दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

'फिर हेरा फेरी' सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झालं. नीरज यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांच्या जुहूमधील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक झाला. त्यानंतर त्यांना  दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यावेळी ते कोमामध्ये गेल्याने, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांनी त्यांना मुंबईतील आपल्या घरी आणलं होते. फिरोज नाडियावाला हेच त्यांची सर्व काळजी घेत होते. 

नीरज यांनी फिर हेरा फेरी, खिलाडी 420, सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रंगभूमीवरही ते सक्रिय होते. गुजराती भाषेतील ‘आफ्टरनून’ नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नीरज हे एक उत्तम लेखक देखील होते. त्यांनी रंगीला, अकेले हम अकेले तुम, ताल, जोश, बदमाश, चोरी चोरी चुपके चुपके, आवारा पागल दिवाना सारख्या सिनेमांसाठी संवाद लेखन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हेराफेरीचा सीक्वेल हेराफेरी 3 वर काम करण्यास सुरुवात केली होती.