Dharma Sangrah
✕

Nitin Desai Funeral: नितीन चंद्रकांत देसाई यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार, अनंतात विलीन

Updated: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (18:44 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी त्यांच्या मृत्यूचा सेटही तयार केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी स्वतः मोठा धनुष्यबाण तयार केला होता. तो तयार झाल्यानंतर नितीनने त्याच धनुष्यबाणाच्या मधोमध गळफास घेऊन आत्महत्या केली. वृत्तानुसार, पोलिसांना नितीनकडून एक टेपरेकॉर्डरही सापडला असून, पोलिसांनी ती सुसाईड नोट मानून तपास सुरू केला आहे.
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांचा मोबाईल फोन फॉरेन्सिक टीमकडे तपासासाठी देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्या फोनमधून जो काही डेटा डिलीट किंवा गहाळ झाला आहे, त्याची योग्य चौकशी केली जाईल. तसेच कोणी संशयाच्या भोवऱ्यात आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. नितीनने बँकेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याचे व्याज सुमारे 250 कोटी रुपये आहे. नितीनने ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्या कंपनीने वसुलीसाठी कायदेशीर पावलेही उचलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जोधा अकबरच्याचित्रपटाच्या सेटवर ठेवण्यात आले असून त्यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओ मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कला विश्वातील अनेक कलाकारांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाने कलाविश्व जगत मध्ये शोककळा पसरली आहे. 
 



Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख
Show comments