मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:09 IST)

सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नाही

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास सीबीआयकडे सोपवला होता. या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून अनेक माहितीही समोर आली. मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूच गुढ उकलण्यात अद्याप काहीच माहिती समोर आली नाहीये. सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
 
सुशांतची आत्महत्या या अँगलने आम्ही तपास करीत आहोत. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांद्वारे जमवण्यात आलेल्या पुराव्यांचा तपास आणि या प्रकरणाशी निगडीत सर्व संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे. अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली.