1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:09 IST)

मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा : भाजप

sushant singh rajput
सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन करा, अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. ‘परमबीर सिंह यांच्या हकालपट्टी बाबत दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, त्याचे साधे उत्तर देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही, त्यामुळे पंतप्रधानांना पत्र पाठवावे लागले. घटनेने पंतप्रधानांना तसा अधिकारही दिला आहे’, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
 
परमबीर सिंग यांच्यासोबतच वांद्रे विभागाचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याही निलंबनाची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. परमबीर सिंग आणि अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी करावी, असंही भातखळकर म्हणाले आहेत.