1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. padmawat

मलेशियातही 'पद्मावत'ला विरोध

padmawat

भारताप्रमाणेच मलेशियामध्येही 'पद्मावत'ला विरोध झाला आहे. मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डाने (एलपीएफ) संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत'ला रिलीज होऊ दिलेला नाही. एलपीएफचे अध्यक्ष मोहम्मद जामबेरी अब्दुल अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये मुसलमान अधिक प्रमाणात आहेत. या चित्रपटाची कहाणी मुसलमानांसाठी संवेदनशील ठरू शकते. हा धोका पाहता चित्रपट रिलीज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

16 व्या दशकामध्ये कवि मलिक मोहम्मद जायसी यांच्या रचनांवर 'पद्मावत' हा चित्रपट बेतला आहे.  चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंह प्रमुख भूमिका आहेत. 

पुढील लेख
श्याम बेनेगल यांना ‘व्ही.शांताराम’ जीवनगौरव पुरस्कार