1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (16:02 IST)

पद्मावत : पूर्ण देशात रिलीज करा, प्रदर्शन न करण्याची याचीका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

suprime court padmawat

सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा पद्मावत विरोधातील अयाचीका फेटाळली आहे. यामुळे संजय लीला भन्साळी यांना  दिलासा  मिळाला आहे. कोर्टात पद्मावत वर  सिनेमावर बंदी आणण्यासाठी मध्य प्रदेश,राजस्थान सरकारने याचिका दाखल केली होती त्यावर नाराजी व्यक्त करत याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.सिनेमा रिलीज झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तर  मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे ती जबाबदारी पार पाडा  असं म्हणत कोर्टाने मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारची सांगत त्यांची ही  याचिका फेटाळली आहे.  कोर्टाने दोन्ही राज्यांना जोरदार खडसावले आहे, कोर्ट म्हणते की तुम्ही जर काही संघटनांच्या धमक्या आणि हिंसेचा हवाला देत असाल तर त्यावर आम्ही सुनावणी का करायची याचे कारण सांगा.  एका घटनात्मक संस्थेने सिनेमाला परवानगी दिलेली आहे, कोर्टानेही रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. तरी तुम्ही पुन्हा कोर्टाकडे येतात त्यामुळे तुमची अर्थात  कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांची आहेत असे सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्मात्यांना दिलासा देत हा सिनेमा सर्व राज्यांमध्ये रिलीज करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता पद्मावत रिलीज होणारच आहे.