मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (14:13 IST)

पंचायत-2 फेम अभिनेत्री आंचल तिवारीचा अपघातात मृत्यू

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी रास्ता अपघात झाला या मध्ये अभिनेत्री आंचल तिवारीचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटार सायकलची धडक होऊन झाला. या अपघातात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात भोजपुरी अभिनेता आणि गायक छोटू पांडे याचा देखील मृत्यू झाला आहे. भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला आहे. आंचल तिवारी हिने पंचायत 2 या वेब सिरीज  मध्ये रिंकीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

एसयूव्ही मध्ये दोन महिलांसह आठ जण प्रवास करत होते. या वेळी एक दुचाकी यांच्या गाडीला येऊन धडकली त्यामुळे दुचाकी आणि एसयूव्ही दुसऱ्या लेन मध्ये गेली. या लेन मध्ये भरधाव येणाऱ्या ट्रक ने धडक दिली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी येऊन मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.पोलिस पुढील तपास करत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit