शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2017 (09:09 IST)

मिका सिंग पुन्हा वादात

पॉप गायक मिका सिंग याने चक्क पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटले आहे. येत्या 12 ऑगस्टला अमेरिकेत मिका सिंग स्टेज शो करणार असल्याचे त्याने जाहीर केले. न्यूयॉर्कमध्ये नुकताच  त्याने एक व्हिडिओ बाईट दिला आहे. त्यामध्ये मिकाने पाकिस्तानचा उल्लेख ‘हमारा पाकिस्तान’ असा केला आहे. या व्हिडिओमध्ये तो भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हा शो करत असल्याचे म्हणत आहे. तसेच तो या शोसाठी एकही पैसा मानधन घेत नसल्याचे  या व्हिडिओतून त्याने म्हटले आहे.पण पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटल्यामुळे आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून त्याच्यावर टीका होताना दिसत आहे.