रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (08:15 IST)

बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान शिर्डीत साईबाबाबांच्या चरणी लीन

shahrukh khan
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी डंकी सिनेमामुळे चर्चेत आहे.
शाहरुखने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकुमार हिराणी यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय केला आहे.  त्याची मुलगी सुहानासह शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने वैष्णोदेवीचे दर्शनही घेतले होते. आज तो शिर्डीत आल्याचा व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने ट्विटरवर प्रसिद्ध केला.
 
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. पांढरा टी शर्ट, त्यावर काळे जॅकेट, टोपी व गळ्यात माळ हा शाहरुख खानचा पेहराव आकर्षित करीत होता. शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना आणि मॅनेजर पूजा ददलानी होते.

Edited by -Ratnadeep Ranshoor