PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पंत प्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 26 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय महाराष्ट्र -गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहे. महाराष्ट्रात ते दुपारी 1 वाजता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहे. या मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उदघाटन ते करणार आहे. नंतर ते अहमदनगर येथे निळवंडे धरणाचे जलपूजन करणार आहे. या दौऱ्यात ते अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार.
पंत प्रधान मोदी हे दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिर्डीच्या काकडी ग्राउंड वर कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन ते करणार असून त्यांनतर ते गोव्याला जाणार आणि संध्याकाळी 6:37 वाजता गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करणार. या स्पर्धेसाठी भारतीय प्रोफेशनल विंड सर्फर कात्या इडा कोएल्हो गुरुवारी 37 व्या राष्ट्रीय खेळांच्या उदघाटनासाठी पंत प्रधानांकडे मशाल सुपूर्द करतील. हा उदघाटन सोहळा फातोर्डातील नेहरू स्टेडियमवर पाच तास चालणार आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
Edited by - Priya Dixit