रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (12:27 IST)

karad: राहत्या घरात स्फोटात चार जखमी, कराडची घटना

कराडच्या हद्दवाढ भागात मुजावर कॉलोनीत लगतच्या वस्तीत आज पहाटे राहत्या घरात स्फोट होऊन घराची भिंत समोरच्या घरावर जाऊन आदळली.या स्फोटात चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कऱ्हाडच्या मुजावर कॉलोनीतील शिरफ मुल्ला यांच्या राहत्या घरात पहाटे स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही. शिरफ मुल्ला यांच्यासह घरातील चौघे जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. शरीफ मुल्ला यांच्या घरातील सर्व जण झोपेत असताना पाण्याच्या टाकीच्या जवळच्या शरीफ यांच्या घरातून मोठा स्फोट झाल्यामुळे परिसर हादरला. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहे. 
 



Edited by - Priya Dixit