गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (09:59 IST)

Bus Accident: दसरा मेळाव्यातुन परतताना शिंदे गटाच्या शिवसैनिकाच्या बसचा अपघात

accident
Bus Accident: शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून परत येताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला.या अपघात 6 ते 7 जण जखमी झाले. 
 
दसरा मेळाव्यातून गावाकडे परत येतांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बसचा मुंबई- आगरा महामार्गावर शहापूर जवळ रात्री 2:30 वाजता ट्रक आणि बसची धडक होऊन अपघात झाला. ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बसची धडक झाली. मागून येणाऱ्या इतर दोन बस देखील एकमेकांना धडकल्या.ट्रक आणि बस थेट उड्डाणपुलावरून दुभाजक तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळला.या अपघात 6 ते 7 कार्यकर्त्ये जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit