सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (11:12 IST)

Bhor Accident : भोरच्या वरंधा घाटात 60 फूट खोल दरीत बस कोसळली, एकाचा मृत्यू

accident
Bhor Accident: भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात वरवंड ते शिरगाव हद्दीत स्वारगेट पुणेहुन भोरमार्गे महाड चिपळूणकडे जाणाऱ्या 17 सीटर मिनीबसचा अपघात होऊन बस 60 फूट खाली दरीत कोसळली आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला आहे. तर धरण्यापासून पाच फुटावर गाडी अधांतरित अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 
 
पुण्याच्या स्वारगेटहून चिपळूणला निघालेली मिनी बस भोर महाड वरंधा घाटात पालटून अपघात झाला या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले आहे. या बस मध्ये 10 प्रवाशी होते. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास शिरगाव हद्दीत आल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस 60 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात अजिंक्य संजय कोलते हा बसचालकाचा मृत्यू झाला आहे. तर चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची  माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केले. 
 
 


Edited by - Priya Dixit