मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (10:39 IST)

Gram Panchayat member ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने हत्या

murder
Gram Panchayat member murdered with a knife पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर येथे ग्रामपंचायत सदस्य संतोष रामदास दौंडकर वय 32ची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, व्यवसायिक स्पर्धेतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 
 संतोष रामदास दौंडकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ग्रामपंचायत सदस्य होते. व्यवसायिक स्पर्धेतून ही हत्याचा झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संतोष यांच्या चेहऱ्यावर कोयत्यानं वार करण्यात आले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
 
दरम्यान या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ठेकेदारीच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. चार वर्षांपूर्वी कनेरसरच्या माजी उपसरपंचाचा देखील असाच खून झाला होता.